मैदानी खेळातून शरीर सुदृढ होण्यास मदत - पोलीस अधीक्षक संजय पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नंदुरबार : मैदानी खेळातून ताणतणाव दूर होवून सुदृढ शरीर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले. ते येथील राज्य शुटींगबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
 
 
 
एस.ए.मिशन ट्रस्ट नंदुरबार व जिल्हा हौशी शुटींगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ नंदुरबार येथे दि.६ ते ७ जानेवारी २०१८ दरम्यान ३१ वी सबज्युनिअर व ज्युनिअर मुले व मुली राज्य शुटींगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०१७-१८ चे आयोजन एस.ए.मिशन हायस्कुल क्रीडांगण, नंदुरबार येथे घेण्यात आली होती. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ.पाटील, संस्थेचे चेअरमन आर.के.वळवी, कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, एस.ए.मिशन हायस्कुलच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष के.आर.आरडे, राज्य सचिव आर.के.ठाकरे आदी उपस्थित होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@