भारतीय सभ्यता संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकते: नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: भारतीय सभ्यता आणि संस्कृती संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकते असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज नवी दिल्ली येथे भारतीय वशांच्या खासदारांची बैठक पार पडली यावेळी खासदारांना संबोधित करतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. तसेच यावेळी पहिल्या खासदारांच्या संमेलनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
भारतामध्ये प्रवासी भारतीयांचे मोठे महत्व आहे. त्यांच्यामुळे भारताची संस्कृती जगापर्यंत पोहोचते. नीती आयोगाने २०२० चा जो ‘अॅक्शन अजेंडा’ तयार केला आहे. त्यामध्ये प्रवासी भारतीयांना विशेष महत्व देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
 
 
 
 
संपूर्ण जगात आता भारताला महत्व दिले जाते. जागतिक स्तरावर भारताचे मत देखील विचारात घेतले जाते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विदेशात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या समस्यांवर चोवीस तास लक्ष ठेवून असतात तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य दिवसरात्र करीत असतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
 
 
 
 
 
भारत ही आपली कर्मभूमी आहे अशा पद्धतीने विचार करून भारताच्या विकासामध्ये तुम्ही योगदान द्यावे असा सल्ला त्यांनी यावेळी खासदारांना दिला. भारतीय नागरिकांची आशा-आकांशा उच्च स्तरावर आहे. येत्या काही वर्षांमध्ये भारत देखील विकसित देशाच्या पंक्तीत येवून उभा राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
@@AUTHORINFO_V1@@