हर गोविंद खुराना यांना गुगल डूडलकडून मानवंदना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नोबेल पुरस्काराने सन्मानित हर गोविंद खुराना यांना आज गुगलने डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. हर गोविंद खुराना यांच्या ९६ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने एक छान डूडल तयार केले आहे. ‘आण्विक जीव विज्ञान’ हा हर गोविंद खुराना यांच्या संशोधनाचा विषय होता. 

 
भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ हर गोविंद खुराना यांचा जन्म भारतात झाला असून ते भारतीय प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील महत्वाची कडी शोधण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल शास्त्रज्ञ रॉबर्ट डब्ल्यू. हॉली आणि शास्त्रज्ञ मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्या सोबतीने १९६८ मध्ये त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
 
@@AUTHORINFO_V1@@