चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती नको - केंद्र सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : चित्रपटगृहामध्ये सिनेमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत लावण्याची सक्ती रद्द करण्यात यावी, असे आवाहन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयकडे आज केले आहे. गेल्या वर्षी न्यायालयाने जारी केलेल्या आदेशामध्ये सुधारणा करून चित्रपटगृहांमधील 'राष्ट्रगीता'ची सक्ती रद्द करावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
 
 
 
केंद्र सरकारकडून या संबंधी न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली असून यामध्ये न्यायालयने आपल्या आदेशामध्ये पुन्हा एकदा नवीन सुधारणा करावी, असे आवाहन केंद्र सरकारने यात केले आहे. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी तसेच त्या प्रसंगी नागरिकांकडून पाळण्यात येणाऱ्या शिष्टाचारासंबंधी सरकारने एक समिती स्थापन केली असून येत्या सहा महिन्यामध्ये ही समिती राष्ट्रगीतासंबंधी आपला अहवाल सादर करेल, व त्यानंतर चित्रपटगृहांमधील राष्ट्रगीत लावण्यासंबंधी सरकार निर्णय घेऊ शकेल, त्यामुळे न्यायालयाने आपल्या आदेशात सुधारणा करून राष्ट्रगीताची सक्ती रद्द करावी, असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
 
 
 
गेल्या नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत लावण्याची सक्ती केली होती. यासंबंधात गेल्या वर्षी अनेक वादविवाद आणि चर्चेनंतर न्यायालयाने हा आदेश जारी केला होता. तसेच केंद्र सरकारने या संबंधी समितीच्या माध्यमातून अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे देखील न्यायालयाने सरकारला सुचवले होते. त्यानुसार सरकारने आत समितीची स्थापना केली असून न्यायालयाने आपला आदेश मागे घ्यावा, असे म्हटले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@