भिवंडी पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

सभापतिपदी रवीना जाधव, उपसभापती पद मनसेकडे

 

 
 
 
 
भिवंडी : भिवंडी पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकला असून, सभापतीपदी भाजपच्या रवीना रवींद्र जाधव यांची, तर उपसभापतिपदी मनसेच्या वृषाली रवींद्र विशे यांची निवड झाली. ईश्वरीय चिठ्ठीत सभापतीपदासाठी भाजपला कौल मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
 
 
पंचायत समितीत भाजप व शिवसेना प्रत्येकी १९, काँग्रेस २, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे राजकीय बलाबल होते. खा. कपिल पाटील यांची विकासाची दृष्टी लक्षात घेऊन काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चुरस निर्माण झाली होती.
 
 
भाजपतर्फे रवीना जाधव व शिवसेनेतर्फे विद्या प्रकाश थळे रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २१ मते मिळाल्यावर चिठ्ठी उडविण्यात आली, त्यात भाजपला कौल मिळाला. या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपसभापतिपदाच्या निवडणुकीतही चिठ्ठी उडविण्यात आली. त्यात मनसेला कौल मिळाला. मनसेच्या वृषाली रवींद्र विशे व भाजपच्या ललिता प्रताप पाटील यांच्यात लढत झाली. त्यांना प्रत्येकी २१ मते मिळाली. त्यात वृषाली विशे यांना नशीबाने साथ दिल्याने उपसभापतीपद मिळाले.
 
कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व
 
पंचायत समितीत कुणबी समाजाला सभापतीपद देण्याची आग्रही मागणी पुढे आली होती. त्यानंतर खासदार कपिल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केल्यानंतर कुणबी समाजाच्या रवीना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निर्णयामुळे भिवंडी तालुक्यातील कुणबी समाजाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@