पुण्यात सायकल शेअरिंग योजनेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

 
 
पुणे : पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुणे शहरात उभारण्यात आलेल्या शेअरिंग सायकल योजनेला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून पहिल्याच महिन्यात या योजनेच्या माध्यमातून २५ हजार ७३८ नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध परिसरात या सायकलच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पुणे विद्यापीठ आणि औंध परिसरातील झुमकार पेडलच्या (PEDL) सहकार्याने हा उपक्रम गेल्या महिन्यापूर्वी सुरु करण्यात आला होता. या उपक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सज्ज अशी सायकल केवळ १ रुपयात अर्ध्या तासासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येते. यामाध्यमातून पुणे विद्यापीठात आतापर्यंत १४ हजार तर औंध परिसरात आतापर्यंत ११ हजाराहून अधिक फेऱ्या झालेल्या आहेत.

पुण्यात दिवसेंदिवस वाढत चालेल्या वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी  पुण्यामध्ये सायकलस्वारांना अधिक चालना देण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी काही संस्थांकडून प्रायोगिक तत्वावर असे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच नागरिकांकडून देखील याला चांगला प्रतिसाद दिला जात आहे. 
@@AUTHORINFO_V1@@