मेवानीचा आणखीन एक कार्यक्रम रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |




नवी दिल्ली : आपल्या भडकाऊ भाषणासाठी सध्या देशभरात चर्चा विषय बनलेला गुजरातचा आमदार जिग्नेश मेवानी याचा नवी दिल्ली येथे होणार 'युवा हुंकार मोर्चा' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रम रद्द करण्यामागेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणूनच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.


नवी दिल्लीतील संसद मार्ग येथे उद्या दुपारी १२ वाजता 'युवा हुंकार रॅली' या कार्यक्रमाचे आणि जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेवानी याची प्रमुख उपस्थिती असणार होती व जेएनयूमधील अनेक विद्यार्थी देखील यात सहभागी होणार होते. मेवानी हा कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून देखील संबोधित करणार होता. त्यामुळे मेवानी याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे कसलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच हा कार्यक्रम रद्द केल्याचे बोलले जात आहे. परंतु अजून तरी याविषयी कसल्याही प्रकारची ठोस माहिती समोर आलेले नाही.





गेल्या ३१ तारखेला पुण्यातील शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत मेवानी आणि खालिद या दोघांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच 'जातीय' वाद निर्माण झाला होता. या वादाचे लोण गुजरात, मध्यप्रदेशपर्यंत पसरले होते. तसेच संसदेत देखील याचे पडसाद उमटले होते. यानंतर मेवानी याच्या दोन कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली होते.
@@AUTHORINFO_V1@@