दिल्ली पुन्हा रडारवर; २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

दिल्ली पोलिसांकडून एका आरोपीला अटक

अक्षरधाम मंदिरासह अनेक महत्त्वाची ठिकाणे रडारवर

 
 
 
नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहर पुन्हा एकदा रडारवर आले आहे. येत्या २६ तारखेला होणाऱ्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून दिल्लीमध्ये काही ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उघड केले आहे. यासंबंधी एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले असून आणखीन दोन संशयित आरोपींना पकडण्यासाठी युपी एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच राज्यात हायअलर्ट देखील जारी केला आहे.
 
दिल्लीहून जाणाऱ्या भोपाळ शताब्दी एक्सप्रेसमधून काल संध्याकाळी एका प्रवासी प्रवास करत असताना, त्याच्या संशयात्मक हालचाली पाहून रेल्वेच्या टीसीने मथुरा पोलिसांशी संपर्क साधला व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रवाशाची चौकशी केली असताना त्याने आपले नाव बिलाल अहमद वानी असे सांगितले. तसेच तो मुळचा अनंतनाग येथील रहिवासी असल्याचे त्याने कबुल केले. यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता, येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान दिल्लीतील अक्षरधामसह शहरातील काही प्रमुख ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा आपला कट असल्याचे त्याने जाहीर केले व या कटामध्ये आपल्यासह आणखीन दोन साथीदार असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली.
 
यानंतर मथुरा पोलिसांनी ही माहिती यूपी एटीएस आणि दिल्ली पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बिलाल याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील काही हॉटेल्सवर छापे टाकले. परंतु हे दोन्ही संशयित आरोपी अगोदरच पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण राज्यामध्ये हायअलर्ट जारी केला असून या आरोपींना पकडण्यासाठी आपली विशेष पथक देखील रवाना केले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@