भंडारा कौशल्ययुक्त जिल्हा व्हावा - ना. रणजित पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

 
 
 
भंडारा : महाराष्ट्र शासनाने २ कोटी युवकांना रोजगार देण्याचा निर्धार केला असून त्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने राज्यातील तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण मोठया प्रमाणात दिले आहे. भंडारा जिल्हयामध्ये स्वंयरोजगाराला वाव असून भंडारा जिल्हा कौशल्ययुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
जगातील इतर देशाच्या तुलनेत भारताकडे मानव संसाधन अधिक आहे. हे संसाधन कौशल्ययुक्त झाल्यास देश अधिक प्रगत होईल. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात प्रथमच कौशल्य विकास विकास हे मंत्रालय सुरु केले. महाराष्ट्रात या मंत्रालयाअंतर्गत प्रशिक्षणाची योजना राबविली जात आहे. शिक्षणासोबतच प्रशिक्षण आवश्यक असून युवक –युवतींनी आपल्या मधील गुण व कौशल्य ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडावे. केवळ नौकरीच्या मागे न धावता कौशल्याच्या बळावर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाचा कौशल्य प्रशिक्षणावर मोठा भर असुन व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना कौशल्य प्रशिक्षणाचा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. मोहाडी नगर पंचायतने स्वच्छतेत चांगले कार्य करावे असे सांगून पाटील म्हणाले की, मोहाडी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. शासन निधी देईल. मात्र हा आराखडा सर्वंकष असावा.
@@AUTHORINFO_V1@@