त्रिपुरा येथे मजूरांसाठी रोजंदारी भत्ता इतका कमी का? : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |


 
त्रिपुरा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मजूरांसाठी रोजंदारी भत्ता ३४० रुपये ठरवला असताना त्रिपुरा येथे माणिक सरकार केवळ १७० रुपये रोज का देत आहे? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केला. त्रिपुरा येथे भविष्यात असलेल्या निवडणुतरींच्या पार्श्वभूमीवर जनसभेला संबोधित करताना ते आज बोलत होते.
 
 
 
मजूरांना केवळ १७० रुपये रोज देवून माणिक सरकार त्यांच्यावर उपकार केल्यासारखे वागत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्रिपुरा येथे देखील भारतीय जनता पक्षाचे सरकार रोजंदारी भत्ता वाढवून ३४० रुपये रोज करेल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
 
 
 
 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवे वेतन आयोग देखील लवकरच येथे लागू करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. या सभेत मोठ्या संख्येत नागरिक सहभागी झाले होते. गुजरात नंतर आता त्रिपुरा येथे देखील भारतीय जनता पक्ष आपले पाय रोवण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@