सैन्याचे आधुनिकीकरण महत्त्वाचे : बिपीन रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

नवी दिल्ली : 'सध्याचे युग हे बदलाचे युग आहे, या बदलत्या युगाबरोबर आपल्या लष्कराचे देखील आधुनिकीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यातील युद्ध लढण्यासाठी प्रत्येक आघाडीवरील भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण होणे महत्त्वाचे आहे', असे मत भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज केले. नवी दिल्ली येथे आयोजित 'आर्मी टेक्नॉलॉजी सेमिनार' या कार्यक्रमात आज ते बोलत होते.
 
'जग आधुनिक होत चालले आहे. त्यामुळे भविष्यातील युद्ध हे अत्याधिक किचकट होणार आहे, अशा युद्धांसाठी आपण आपल्या सैन्याला देखील तयार केले पाहिजे. यामुळे सैनिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सामग्रीची निर्मिती ही देशांतर्गत झाली पाहिजे. यासाठी देशातील काही कंपन्यांनी एकत्र येऊन सैन्यासाठी आवश्यक असलेले नवे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे' असे ते यावेळी म्हणाले.
 
यानंतर भारतीय लष्काराच्या विविध अंगांवर भाष्य करत, सैन्यासाठी आवश्यक असलेल्या काही साधनांची आणि त्यात आवश्यक असलेल्या नव्या बदलाची माहिती त्यांनी यावेळी दिली. देश हा आपल्या सर्वांचा असून त्याच्या रक्षणाची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे देखील ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@