भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या संमेलनात महिला शक्तीचा आविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : महिला सशक्तीकरण याचे उदाहरण ठरावे या पद्धतीने भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी वांगीकर यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे विभागीय अधिकारी आर. आर. मारवाडी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
 
या प्रसंगी शाळेतल्या विद्यार्थिनींनी प्रदर्शनीचे आयोजन केले होते. अडथळ्यांची शर्यत, एरोबिक्स आणि स्व संरक्षण, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, योगा आणि पीटी यात सर्व विद्यार्थिनींनी दाखवलेले कौशल्य यामुळे शिक्षक आणि पालक भारावून गेले.
 
 
सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वीरमाता जिजामाता यांच्यापासून ते सध्याच्या काळातील सैन्य दलातील अनेक महिलांचे योगदान याला आदरांजली वाहण्यात आली. गेल्या काही शतकात विविध क्षेत्रात महिलांनी मिळवलेले यश आणि देदीप्यमान कामगिरी याचेही प्रदर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून करण्यात आले.
 
 
दुसर्‍या दिवशी भोसला मिलिटरी स्कूल मुलींच्या परेडचे औपचारिक प्रर्दशन केले. त्यांच्या वार्षिक उत्सवाचे प्रमुख म्हणून कर्नल चित्ते यांनी मुख्य अतिथी म्हणून सलामी दिली. नंतर विद्यार्थिनीनी अश्वारोहण करत एक उत्तम प्रात्यक्षिक सर्वांसमोर सादर केले. बक्षीस वितरणसह कार्यक्रम पार पडला.
 
 
दोन दिवसीय वार्षिक संमेलनातील विद्यार्थिनींच्या सृजनशील कल्पना आणि कौशल्य याचे कौतुक सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह नितीन गर्गे, कोषाध्यक्ष अतुल पाटणकर, नाशिक विभाग कोष प्रमुख हेमंत देशपांडे, कामरीचे संचालक कमांडोर राजसिंग धनकर, कॅप्टन (निवृत्त) एस.डी. कुलकर्णी, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या चेअरमन स्मृती ठाकूर, मुख्याध्यापक डॉ. अंजली सक्सेना आणि कमांडंट सुप्रिया चित्रे यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@