जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर: आज जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदुरा क्षेत्रात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. आज सकाळपासून या भागात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला होता. 
 
 
 
त्यामुळे सुरक्षा रक्षक, सीमा सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफ आणि विशेष मोहीम गट अर्थात ओएसजी सकाळपासून या दहशतवाद्यांवर गोळीबार करत होते. या गोळीबारात एका दहशतवाद्याला मारण्यात जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात असल्याने सीआरपीएफ, सुरक्षा रक्षक आणि ओएसजी मिळून या गोळीबाराला उत्तर देत आहे. 
 
 
 
२६ जानेवारीला या दिवशी राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने सध्या संपूर्ण सीमेवरील सुरक्षा व्यवस्था तसेच राजधानीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@