नचिकेत लेलेच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला नवा आवाज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |




 

रविवारचा संपूर्ण दिवस संगीतप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरला. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु असलेली संगीताची मैफिल अर्थात 'सारेगमप -घे पंगा कर दंगा' पर्वाची महादंगल जानेवारीला पार पडली. अंतिम फेरीत पोहचलेल्या १२ सुरेल दंगेखोरांमधून या पर्वाचा विजेता निवडण्यात आला. कल्याणच्या नचिकेत लेलेने आपल्या सुमधुरस्वरांनी 'सारेगमप: घेपंगा कर दंगा' पर्वाचे जेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले उज्ज्वल गजभार आणि तृतीय क्रमांक पटकावला अक्षय घाणेकरने! तिघांनीही आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं.

 
 
 

या सोहळ्याचं खास आकर्षण ठरला, तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार! अक्षय आणि सोनम कपूर त्यांच्या आगामी 'पॅडमॅन'या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सारेगमपच्यामंचावर आले होते. अक्षयने आपल्या खास शैलीत 'ढगाला लागली कळ' हे गाणं गाऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांच्या हस्ते नचिकेतचा 'ट्रॉफी' देऊन गौरव करण्यात आला. परीक्षक बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊतसोबत सुरांचा हा महासोहळा रंगला. १२ स्पर्धकांनी गायलेली एका पेक्षा एक गाणी, नेत्रदीपकसादरीकरण, हटके परफॉर्मन्सन या मनोरंजनाच्या यात्रेचा रसिक प्रेक्षकांनी लाईव्ह आनंद घेतला.

 
 

 

त्यांच्याशिवाय, स्पर्धकांच्या सादरीकरणावर बारीक लक्ष ठेऊन होते खासपॅनालिस्ट, ज्यात होते पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, निलेश मोहरीर, मनवा नाईक आणि हृषीकेश जोशी आणि यांच्या पॅनलचं सूत्रसंचालन करत होता अभिनेता प्रियदर्शन जाधव!

सलग १० तास सुरु असलेली ही संगीताची मॅरेथॉन उत्तोरोत्तर रंगत गेली. पहिल्यांदाच टेलिव्हिजनच्या इतिहासात अशा प्रकारचा लाइव्ह शो भरवण्यात आला होतासारेगमपचं हे तेरावं पर्व खऱ्या अर्थाने वेगळं ठरलं. यापुढील पर्वांमध्ये सुद्धा निश्चितच वेगळेपणा पाहायला मिळेल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@