भारतीय वंशाच्या अझीझ अन्सारी याला ‘गोल्डन ग्लोब्ज’ पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
लॉस एंजलीस : काल अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे झालेल्या ‘गोल्डन ग्लोब्ज’ पुरस्कार समारंभात भारतीय वंशाच्या अझीझ अन्सारी याला ‘गोल्डन ग्लोब्ज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी ७५ वा ‘गोल्डन ग्लोब्ज’ पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 
 
 
 
 
 
हॉलीवूडमधील प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिका ‘मास्टर ऑफ नन’ मध्ये उत्कृष्ट अभिनय साकारण्यासाठी भारतीय वंशाचा कलाकार अझीझ अन्सारी याला ‘गोल्डन ग्लोब्ज’ पुरस्कार देण्यात आला आहे. हॉलीवूडमध्ये अतिशय मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार भारतीय वंशाच्या कलाकाराला मिळणे ही अतिशय मोठी गोष्ट मानली जात आहे. 
 
 
 
काल या समारंभात विविध कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हॉलीवूडमधील चित्रपट सृष्टीतील आणि मालिकेतील मोठा पुरस्कार म्हणून देखील याला ओळखले जाते. 
 
@@AUTHORINFO_V1@@