हरियाणामधील शाळा १४ जानेवारीपर्यंत बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
हरियाणा: संपूर्ण देशात वाढता थंडीचा कडाका सगळ्यांना जाणवत असला तरी देखील हरियाणा राज्यात वाढलेल्या गारठ्याने १४ जानेवारीपर्यंत तेथील सरकारी शाळा आणि खाजगी शाळा बंद ठेवण्यात आले आहे. थंडी आणि थंड हवेच्या प्रभावामुळे लोकांचा बचाव व्हावा यासाठी हरियाणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या हरियाणामध्ये १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात येत आहे.
 
 
 
 
संपूर्ण देशातील तापमान सध्या खाली उतरले असून धुक्यामुळे बरेच रस्ते, रेल्वे गाड्या तसेच उड्डाण काही तासांसाठी बंद तसेच उशिराने सुरु करण्यात येत आहे. सध्या भारतातील मुख्य शहरांमध्ये तापमान चांगलेच उतरले आहे. दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र रा राज्यांमध्ये तापमान उतरले आहे. 
 
 
 
आग्रा-१९ अंश सेल्सिअस, अमृतसर - १५ अंश सेल्सिअस, भोपाळ - १९ अंश सेल्सिअस, चंडीगड – १७ अंश सेल्सिअस, दिल्ली – १९ अंश सेल्सिअस, पटना – २० अंश सेल्सिअस, शिमला – १० अंश सेल्सिअस, श्रीनगर – ७ अंश सेल्सिअस, चेरापुंजी – १४ अंश सेल्सिअस, भुवनेश्वर – २२ अंश सेल्सिअस, नागपूर- २० अंश सेल्सिअस, पुणे- १८ अंश सेल्सिअस अशा प्रकारचे तापमान सध्या संपूर्ण देशात अनुभवायला मिळत आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@