वर्षभरात सत्ता पालट, काय मागायचे ते आताच मागा : गिरीष बापट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

 
पुणे :  येत्या वर्षभरानंतर महाराष्ट्रात सत्ता पालट होणार आहे, त्यामुळे काय मागायचे असेल ते आताच मागून घ्या, आशी वादग्रस्त टिप्पणी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी केली आहे. यामुळे एका नव्या चर्चेला वाचा फुटली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या डाळींब महासंघाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते.
 
"या कार्यक्रमात मी ज्या कामांबद्दल बोललो आहे त्याच्या पाठपुराव्यासाठी मी अधिकाऱ्यांसोबत सर्किट हाऊसमध्ये चर्चा करेन. तसेच मुंबईत देखील मुख्यमंत्र्यांसोबत बोलेन. ही सगळी कामे पुढील वर्षभरात करुन घेईन. कारण, त्यानंतर सत्ता पालट होणार आहे. त्यामुळे काय मागायचे ते आताच मागा, पुढे काय होणार याची चर्चा मी करणार नाही, मात्र काय होणार हे मला माहीत आहे." असे वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले आहे.
 
सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांना मदत करणे हे त्या सरकारचे कर्तव्य आहे, आम्ही देखील शेतकऱ्यांच्या हितांसाठी सर्व प्रयत्न करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. मात्र त्यांच्या 'सत्ता पालटीच्या' विधानामुळे एकूणच राजकीय वादंग उठले आहे.
@@AUTHORINFO_V1@@