पत्रकारांना हेल्मेट वाटपाचा उपक्रम स्तुत्य : दादा भुसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी कार्यक्रम


 
 
 
 
नाशिक : पत्रकारांना धावपळीचे जीवन जगत मोठी जबाबदारी पार पाडावी लागते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची गरज असलेले हेल्मेट वाटपाचा तसेच आरोग्य तपासणीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक शाखेने राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन ग्रामीण विकास व सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
 
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त आज २०० हेल्मेट वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून यापैकी आज ७० हेल्मेट जिल्ह्यातील नामांकित दैनिकातील उत्कृष्ट पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद पत्रकार गणेश घुरी यांचे महिन्यापूर्वी अकाली निधन झाल्यामुळे कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला. तिडके कॉलनीतील ग्रामसेवक भवनात झालेल्या या कार्यक्रमास मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन अध्यक्षस्थानी होते.
 
 
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, माहिती उपसंचालक किरण मोघे, पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष वाघचौरे, पत्रकार संघाचे जनसंपर्क अधिकारी नवनाथ जाधव, मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे, जयंत महाजन, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मुख्य आयोजक डी. एम. जगताप, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर देशपांडे, संघटक हेमंत चंद्रात्रे, सुरेश पवार आदींसह जिल्हा आणि शहरातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
 
माहिती उपसंचालक किरण मोघे यांनी पत्रकारांना शासकीय स्तरावर पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले तर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी पत्रकार खूप मोलाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. वायुनंदन यांनी महाराष्ट्रात मीडिया, सांस्कृतिक आणि थिएटर या तीन बाबी अत्यंत प्रभावी असल्याचे सांगून पत्रकारांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन समतोल लेखन करावे, असे सुचविले. अध्यक्षपदाची सूचना पद्माकर देशपांडे यांनी मांडली. त्यास सुरेश पवार यांनी अनुमोदन दिले. प्रास्ताविक डी. एम. जगताप यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@