महापौरांसह पदाधिकार्‍यांनी केली स्वच्छता पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी, पूर्व विभाग सभापती शाहीन मिर्झा, अति.आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त आर एम बहिरम, शहर अभियंता यु. बी. पवार, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी शहरातील अनेक ठिकाणी पाहणी केली.
 
त्यामध्ये मुख्यतः शरणपूर रोड परिसर, बॉईज टाऊन रोड, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, कस्तुरबा नगर, मॉडेल कॉलनी, भोसला मिलिटरी स्कूल, सप्तशृंगी नगर, आनंदवली परिसर, बालाजी मंदिर येथील उद्यान परिसरातील आरोग्यविषयक समस्या, रस्ते, वीज, गटार, बांधकाम विभागातील आदी ठिकाणी दुभाजक सुशोभीकरण, वाहतूक बेट, तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण या विषयाच्या समस्या जाणून घेतल्या व परिसरातील नागरिकांनी अधिकार्‍यांची मानसिकता सकारात्मक होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
 
त्यानुसार संबंधित विभागाचे अधिकारी यांना तेथील नियमित स्वच्छता आदी समस्यांचे तात्काळ निराकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले. या पाहणीच्या वेळी मा. नगरसेवक हिमगौरी आहेर, स्वाती भामरे, योगेश हिरे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@