चांगले खेळाडू तयार होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न - सैय्यद नईमोद्दीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 

ऊर्दू हायस्कुलमध्ये तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाला सुरुवात

नंदुरबार : खेळाच्या विकासासाठी आमची संस्था कटीबद्ध आहे, चांगले खेळाडू तयार होण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन सैय्यद नईमोद्दीन यांनी केले. ते येथील उर्दू हायस्कुलमध्ये झालेल्या क्रीडा महोत्सवात बोलत होते.
 
 
 
येथील ऊर्दू हायस्कुल, बादशाह नगर येथे १२ वा वार्षिक क्रीडा महोत्सवाला आज दि. ८ जानेवारी २०१८ पासून सुरुवात झाली. सदर क्रीडा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. यात फुटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी, रनिंग, रस्सीखेच अशा विविध खेळांचा समावेश असणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सै. इमाम बादशाह शिक्षण संस्थेचे चेअरमन सैय्यद नईमोद्दीन यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक काजी तमीजोद्दीन उपस्थित होते. तसेच निवृत्त मुख्याध्यापक फहीम अकरम, खलील अहेमद (बहादरपुरी), रजियोद्दीन जनाब, हाजी बिलाल मेमन, कुरेश अ.वहाब, फारुख पठाण, सैय्यद नआमत अली, कुरेशी जुबेर शेख सलिम, हाजी ईस्माईल खाटीक, हाजी अय्युब खाटीक, मुख्याध्यापक अजय मराठे (सुतारपाडा), मुख्याध्यापक दत्तू पाटील (सेजवा) आदी उपस्थित होते.
 
 
 
सै.नईमोद्दीन पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी संस्था नेहमी मदत करते, आपल्या संस्थेतून चांगले खेळाडू तयार होवून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे, त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. निवृत्त मुख्याध्यापक फहीम अकरम आपल्या मनोगतात म्हणाले की, नगरसेवक तसेच इतर बांधवांनी एकत्र येऊन एक गट बनवावा आणि त्या गटाद्वारे खेळाडूंच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल, यासाठी प्रयत्न करावेत. नगरसेवक काझी तमीजोद्दीन म्हणाले की, खेळाडूंच्या अडचणी दूर करुन आर्थिक मदतीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार. यावेळी राज्यस्तरीय खेळाडूंच्या हस्ते क्रीडा मशाल देवून खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. क्रीडा शिक्षक जावेद बागवान यांनी विद्यार्थ्यांकडून संचालन करुन घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हैदर मोहम्मद जाफर व जावेद अजीज बागवान यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक शेख रियाज यांनी मानले. क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी शेख साबिर अनीस, कुरेशी अरशद अ.वहाब, खाटीक इमरान अरशोद्दीन, शेख निलोफर अ.कादर, शेख अनिसा अ.रहेमान, खान सलमा याकुब, पठाण फिरदौस असलम खान आदी शिक्षकवृंद परिश्रम घेत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@