३२ महिला जाणार 'मेहरम'शिवाय हजला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय मुस्लीम समाजात प्रचलित असलेली मेहरम प्रथा रद्द झाल्यानंतर भारतामधून यावर्षी ३२ मुस्लीम महिला या 'मेहरम' शिवाय हज यात्रेला जाणार आहेत. भारत सरकारने मेहरम प्रथा बंद केल्यामुळे भारतीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय मुस्लीम महिलांना स्वतंत्रपणे हज यात्रा करता येणार आहे.
 
 
भारतीय मुस्लीम समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 'मेहरम' ही अघोषित अशा प्रथा सुरु होती. या प्रथेनुसार भारतीय मुस्लीम महिलांना हज यात्रेला जाण्यासाठी एक पुरुष रक्षक अर्थात 'मेहरम' सोबत असणे बंधनकारक होते. परंतु भारत सरकारने यावर कारवाई करत ही प्रथा रद्द केली. सरकारच्या या कारवाईनंतर देशभरातून १३०० हून अधिक मुस्लीम महिलांनी हज यात्रेसाठी आपली नावनोंदणी केली होती. यासर्वांमधून एकूण ३२ महिलांची यावर्षीच्या हज यात्रेसाठी निवड करण्यात आली आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ३१ डिसेंबरला झालेल्या 'मन कि बात' या आपल्या कार्यक्रमामध्ये 'मेहरम' प्रथेचा उल्लेख केला होता. मेहरम प्रथा ही भारतीय मुस्लीम महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशाप्रकारे घातक आहे, हे त्यांनी यात सांगितले होते. तसेच ही प्रथा रद्द झाल्यामुळे मुस्लीम महिलांमध्ये वाढलेल्या आत्मविश्वासाचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला होता.
@@AUTHORINFO_V1@@