‘सक्षम’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार - रणजीत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
सक्षममुळे गुणवत्ता वाढणार

 
भंडारा: जिल्हा प्रशासनाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत मूल्य व कौशल्यावर आधारित तयार केलेला 'सक्षम' हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. हा उपक्रम केवळ विद्यार्थीच नाही तर प्रशासनाला सुद्धा 'सक्षम' करणारा आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
 
 
कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, भंडारा यांच्या वतीने मोहाडी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
 
प्रचलित अभ्यासक्रमासोबत २१ कौशल्य व १० मूल्य असलेला सक्षम उपक्रम जिल्हा प्रशासनाने नुकताच तयार केला आहे. हा उपक्रम केवळ नाविन्यपूर्ण नाही तर शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे. सक्षम राज्यभर लागू केल्यास कौशल्य प्रवीण विद्यार्थी घडविण्यासाठी मोलाची मदत होईल असे सांगून आमदार चरण वाघमारे यांनी सक्षम उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशी विनंती राज्यमंत्री रणजीत पाटील यांना केली.
 
 
 
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. केवळ पुस्तकीय शिक्षण घेऊन चालणार नाही, शिक्षणाला कौशल्याची जोड आवश्यक आहे. या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने तयार केलेला सक्षम उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@