'चप्पल चोर, चप्पल चोर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |

अमेरिकेतील पाक दूतावासाबाहेर भारतीय नागरिकांच्या घोषणा





वॉशिंग्टन :
पाकिस्तानच्या तुरुंगात बंदी असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीबरोबर पाकिस्तानने केलेल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ अमेरिकेतील भारतीय नागरिक तसेच बलुच नेत्यांनी पाकिस्तानला आज चांगलाच धडा शिकवला आहे. जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या चप्पला काढून घेतल्यामुळे अमेरिकेतील पाक दूतावासाबाहेर 'पाकिस्तान चप्पल चोर' असा घोषणा देत पाकिस्तानच्या कृतीवर भारतीय नागरिकांकडून जोरदार टीका करण्यात आली. तसेच पाकिस्तानने अमेरिकेची देखील सातत्याने फसवणूक करत, दहशतवादाला खतपाणी घातले आहे व त्यामुळेच आज जगभरात दहशतवाद पसरला आहे, अशी टीका यावेळी बलोच नेत्यांनी केली.
अमेरिकेतील भारतीय नागरिक आणि तेथील बलुच नेते यांनी वॉशिंग्टन येथे असलेल्या पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर 'चप्पल चोर पाकिस्तान' असे फलक घेऊन निदर्शने केली. पाकिस्तानने या अगोदरच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत जाधव यांना अटक करून त्यांना शिक्षा जाहीर केली होती. यानंतर जाधव कुटुंबियांना पाकिस्तानमध्ये बोलावून त्यांचा बरोबर जी गैरवर्तणूक केली आहे, त्यामुळे पाकिस्तान किती असभ्य आणि संस्कारहीन आहे हे सिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय वारंवारपणे त्याला सांगून देखील तो सुधारत नाही' अशा कटक शब्दात भारतीय नागरिकांनी पाकिस्तानवर यावेळी टीका केली. तसेच 'अमेरिकेचे डॉलर चोर आणि भारताच्या चप्पला चोर हेच काम पाकिस्तान अनेक वर्षांपासून करत असल्याची देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी म्हटले.





गेल्या महिन्यात कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी या त्यांच्या भेटीसाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. यावेळी पाकिस्ताने त्यांच्याबरोबर अत्यंत असभ्य असे वर्तन करत. त्यांना गळ्यात मंगळसूत्र, कपाळावरील टिकलीसह अंगावरील साड्यांऐवजी पाकिस्तानी पद्धतीनुसार सलवार कुर्ता घालण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या चप्पला देखील काढून घेण्यात आल्या होत्या. पाकिस्तानच्या या कृतीवर जगभरातून टीकेची झोड उठल्यानंतर जाधव कुटुंबियांच्या चप्पलांमध्ये कॅमेरा असल्याचा गवगवा पाकिस्तानने केला होता. परंतु नेहमी प्रमाणे पाकिस्तानचा हा खोटारडेपणा देखील जगासमोर उघड झाला होता.

@@AUTHORINFO_V1@@