काश्मीरच्या हितासाठी भारत-पाकने एकत्र यावे : मुफ्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |



अनंतनाग : 'जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या हितासाठी तरी भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन काश्मीर समस्येवर चर्चा करावी' असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली आहे. अनंतनाग येथे आयोजित एका जनसभेमध्ये त्या बोलत होत्या.

'काश्मीर खोऱ्यामध्ये दिवसेंदिवस अशांतता वाढत आहे. भारतीय जवानांचे जीवन हे अत्यंत अमुल्य आहे. परंतु दोन्ही बाजूने होणाऱ्या हल्ल्यांमुळे सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी काश्मिरी जनतेला या चिखलातून बाहेर काढण्यासाठी तरी दोन्ही देशांनी एकत्र यावे. त्यामुळे येथील जनतेचा विचार करून पाकिस्तानचे पंतप्रधान आणि भारतीय पंतप्रधान यांनी एकत्र येऊन याविषयी चर्चा केली पाहिजे' असे मुफ्ती यांनी म्हटले. चर्चा करावी व यातून कायमचा मार्ग काढावा, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

गेल्या आठवड्याभरापासून जम्मू-काश्मीरमधील भारतीय जवानांवर सातत्यने झालेल्या हल्ल्यांमध्ये १५ हून अधिक भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून भारतीय जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडून पाकिस्तानच्या जवानांवर प्रतीहल्ले केले होते. यामध्ये भारतीय जवानांचे देखील मोठे नुकसान झाले होते. 
@@AUTHORINFO_V1@@