उत्तर भारतात कडाक्याची थंडी, जनजीवन विस्कळित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

 
 
उत्तर भारत :  संपूर्ण उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. शीतलहरीमुळेउत्तर भारतात जनजीवन विस्खळित झाले आहे. जम्मू काश्मीर येथे रात्री तापमान -१७ अंश सेल्सियस होते. तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार सगळीकडेच थंडीचा असर दिसून येत आहे. जम्मू काश्मीर येथे हिमवृष्टीझाल्याने उत्तर भारतात थंडी वाढली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. जानेवारी पहिलाच आठवडा या भागासाठी अत्यंत थंड राहिला आहे.
 
दिल्ली येथे धुक्याचा कहर वाढला आहे, यामुळे वाहतूक व्यवस्थेविषयी समस्या निर्माण झाल्या आहेत, तर राजस्थान येथे देखील तापमान १ आणि २ अंश सेल्सिअस असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
पंजाब आणि हरियाणाची परिस्थिती काही वेगळी नाही. येथे देखील थंडीचा प्रकोप वाढला आहे. लहान मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम बंगाल येथे देखील तापमान २ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. बर्दवान आणि आसनसोल येथे तापमान ९ अंश सेल्सिअस झाले आहे.
 
रेल्वे वाहतूकीवर परिणाम :
 
थंडीच्या कडाक्यामुळे उत्तरभारतातील रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या ३६ रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत, दिल्ली येथून धावणाऱ्या ९ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर २८ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
@@AUTHORINFO_V1@@