सलमानखानला जीवानिशी मारण्याची धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

 
जोधपूर (राजस्थान ) :  सिनेसृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची खुली धमकी देण्यात आसी आहे. पंजाब मधील कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईने ही धमकी दिली आहे. राजस्थानच्या जोधपुर मध्ये सलमानला जीवे मारणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.
 
 
 
 
अशी विचित्र धमकी देण्यामागे काय कारण आहे, तसेच त्याचे सलमानसोबत काय वैर आहे या बाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच यावर सलमानने देखील काही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र यामुळे समाजमाध्यमांवर चर्चेचे वादळ उठले आहे.
 
बिष्णोईवर हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. एका उद्योगपतीची हत्या केल्याच्या प्रकरणातील सुनावणीसाठी जोधपूर कोर्टात बिष्णोईला आणण्यात आले होते. त्यावेळी बिष्णोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली.
 
दरम्यान, बिष्णोईच्या धमकीची गंभीर दखल घेत, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती पोलासांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@