रिक्षा टॅक्सी चालकमालक असोसिएशनतर्फे ऑनलाईन ई-सेवा केंद्र सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

परवाना, परमीट सारख्या सुविधा मिळणार ऑनलाईन

 
 
 
कल्याण : आरटीओ कार्यालयात विविध कामासाठी रिक्षाचालकांची होणारी परवड लक्षात घेता, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनतर्फे ऑनलाईन ई-सेवा उपकेंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.
 
यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी मासुमदार, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे संभाजी जाधव, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे श्रीकांत धरणे, सचिव विलास वैद्य, आदीसह रिक्षा चालक मालक उपस्थित होते. रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनतर्फे ऑनलाईन उपकेंद्र कल्याण रेल्वे स्टेशन येथे शुक्रवारी सुरु करण्यात आले.
 
या उपकेंद्राच्या माध्यमातून परवाना, परमीटसारख्या रिक्षाचालक तसेच टॅक्सीचालकांच्या अत्यावश्यक सेवा ऑनलाईन माध्यमातून या केंद्रातून देण्यात येणार आहे. या ऑनलाईन उपकेंद्रामुळे रिक्षाचालकांना त्यांच्या वेळेत त्यांना काम करता येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. तसेच वाहतूक कोंडीची समस्या शहरात वाढत आहे. या वाहतूक कोंडीच्या वेळी वारंवार हॉर्न वाजवले जातात. अशावेळी मनावर आणि हातावर संयम ठेवणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@