पंतप्रधान आज साधणार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

 
 
ग्वालियर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्वालियरच्या टेकनपुर येथे सीमा सुरक्षा दलाच्या कार्यालयात वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्यासोबत भारताच्या सुरक्षेविषयी महत्वाची चर्चा करणार आहेत. पंतप्रधान ग्वालियर येथे दाखल झाले असून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांचे स्वागत केले. पोलिसांच्या वार्षिक परिषदेला ते संबोधित करणार आहेत.
 
 
 
 
पोलिस अधिकाऱ्यांचे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये पंतप्रधान पोलिस अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत, तसेच त्यांच्यासोबत देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा करणार आहेत.
 
 
 
 
या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, खासदार नरेंद्र सिंह तोमर तसेच अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. राजनाथ सिंह हे काल ग्वालियर येथे दाखल झाले आहेत. शनिवार पासून सुरु झालेल्या या तीन दिवसीय संमेलनात देशभरातून साधारण २५० पोलिस अधिकारी सहभागी झाले आहेत. बाह्य तसेच आंतरिक सुरक्षेविषयी या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@