आयुक्तांच्या आदेशानंतर अनधिकृत ढाब्यांवर महापालिकेची कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

आस्थापनांच्या तपासणीसाठी पालिकेकडून पथके गठित

 
 
 
कल्याण : महापालिका कार्यक्षेत्रात असलेले हॉटेल, सिनेमागृहे, मॉल्स, व्यापारी संकुल, बाजार परिसर, नाट्यगृह, रुग्णालये यांचे प्रवेशद्वार व बहिर्गमन मार्ग यांची तपासणी तसेच त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळल्यास ते निष्कासित करण्याकरिता महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी पथके गठित केली आहेत.
 
आस्थापनांमध्ये अनधिकृत बांधकामे आढळल्यास ते निष्कासित करण्याकरिता आयुक्तांनी कालबध्द कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी प्रभागनिहाय अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आज ’ब’ प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत गांधारी पूल ते आधारवाडी चौक या रस्त्यावर असलेल्या १० अनधिकृत ढाबे व चायनीज हातगाड्यांवर उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन जेसीबी व १०० कामगांराच्या मदतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
 
याशिवाय पाच लहान हॉटेल सील करण्यात आले. २७ गावांमधील एमआयडीसी, उद्योगधंदे, गोडाऊन तपासणीसाठी संबंधित प्रभाग अधिकारी आणि बाजार निरीक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पालिकेने ज्या बांधकामांना अधिकृत मान्यता दिली आहे अशा सर्व इमारतींची सुरक्षा विषयक व अग्शिनमन बाबींची पुर्ततेची खातरजमा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@