भारत-द.आफ्रिका कसोटी : आजच्या सामन्यावर पावसामुळे 'पाणी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2018
Total Views |

द.आफ्रिका संघाकडे १४२ धावांची आघडी 



केपटाऊन :
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे आज खेळ रद्द करण्यात आला आहे. आफ्रिका क्रिकेट बोर्डकडून आज खेळ रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले असून उद्या नेहमीच्या वेळेनुसार सामन्याला सुरुवात करण्यात येईल, असे बोर्डकडून जाहीर करण्यात आले आहे.

आजच्या सामन्याच्या सुरुवातीपासून केपटाऊनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खेळ चालू करण्यात येईल, असे बोर्डकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु दिवसभर पाऊस सुरु राहिल्यामुळे आज खेळ रद्द करण्यात येत असल्याचे बोर्डकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. तसेच दररोजच्या वेळेनुसार उद्या या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात येईल, असे देखील बोर्डने स्पष्ट केले आहे.




गेल्या शुक्रवारी भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. खेळाच्या सुरुवातीला द.आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत पहिल्या डावामध्ये द.आफ्रिका संघाने २८६ धावांची मजल मारली होती. यानंतर आलेल्या भारतीय संघाला मात्र द.आफ्रिकेने २०९ धावांवरच रोखले होते.

यानंतर कालदिवसअखेरपर्यंत दुसऱ्या डावामध्ये द.आफ्रिका संघाने २ बाद ६५ धावांची मजल मारली होती. दोन्ही सामन्यांची मिळून द.आफ्रिकेकडे अद्याप १४२ धावांची आघाडी असून दुसऱ्या डावासाठी अद्याप ८ गडी आफ्रिकेकडे आहेत. त्यामुळे आजचा सामना उद्यावर गेल्यामुळे या सामन्याविषयी सध्या प्रचंड उत्सुकता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@