आदर्श मराठी/गुजराती विद्यामंदिरात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नंदुरबार - नंदुरबार येथील स्वा.सै.श्री.गो.दे.आदर्श मराठी विद्यामंदिर व गुजराती विद्यामंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ.नंदा शाह, श्री.भुपेंद्र त्रिवेदी, परिक्षक सौ.चेतना बिरारीस, विज्ञान विभाग प्रमुख फकीरा माळी आदी उपस्थित होते.
 
 
 
विज्ञान प्रदर्शनात एकुण १८० उपकरणे सादर करण्यात आली. यात ऊर्जा, स्वच्छता व पर्यावरण, नैसर्गिक संसाधने, गणितीय उपकरणे, विज्ञानाचा मानवी जीवनातील उपयोग हे ३ री व ४ थीसाठी विषय देण्यात आले होते. ई. १ ते २ रीसाठी वैज्ञानिक खेळणी व वर्कींग मॉडेल हा विषय देण्यात आला होता. यात ३६० विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. व्यवस्थितरित्या उपकरणांची मांडणी केली व सादरीकरण केले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@