जम्मू काश्मीर येथे हिमस्खलन ११ नागरिकांचा मृत्यु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |

 
काश्मीर :  उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले आहे. या घटनेत ११ नागरिक मृत्युमुखी पडले असून अनेक नागरिक बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या हिमस्खलनात एक गाडी अडकल्याचे सांगण्यात येत आहे ज्यामध्ये ७ प्रवासी होते, यापैकी ५ नागरिकांचे मृतदेह काढण्यात जवानांना यश आले आहे. कुपवाडा-तंगधार मार्गावर साधन टॉपजवळ मोठं हिमस्खलन झालं.
 
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लेह आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे, या हिमवृष्टीमुळेच ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. कारगिलमधील तापमान -२० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, हे तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
 
या हिमस्खलनामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे या त्रासात वाढ झाली आहे. शिमल्यासह संपूर्ण हिमाचल प्रदेशात थंडीमुळे खूप हाल झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@