छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
छत्तीसगड : छत्तीसगडमधील बिजापूर या गावात आज केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफने नक्षलवाद्यांचा कट उध्वस्त केला आहे. बिजापूर या भागात रस्त्यावर लावण्यात आलेले बॉम्ब सीआरपीएफने शोधून काढले असून नक्षलवाद्यांचा हा कट उध्वस्त केला आहे.
 
तीन ठिकाणी हे बॉम्ब लावण्यात आले होते. रस्ते उध्वस्त करण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब लावण्यात आले होते. मात्र सीआरपीएफच्या बॉम्ब शोध मोहिमेमध्ये हे बॉम्ब सापडले असून या तिन्ही बॉम्बला निकामी करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकांना तर्रेम गावात १० किलोग्रॅम आणि १८ किलोग्रॅमचे दोन बॉम्ब सापडले होते.
 
रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांना तसेच सुरक्षा रक्षकांना मारण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब लावण्यात आले होते. बऱ्याच वेळा नक्षलवाद्यांकडून बॉम्ब लावण्यात येतात. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हे बॉम्ब जप्त केले जातात. 
 
@@AUTHORINFO_V1@@