सुषमा स्वराज सिंगापूरच्या दौऱ्यासाठी रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
सिंगापूर: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या पाच दिवसीय आग्नेय आशियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यात आज त्या सिंगापूर या देशाच्या भेटीला गेल्या आहेत. याआधी सुषमा स्वराज यांनी इंडोनेशिया देशाची भेट घेतली. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे त्यांनी आज भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.
 
 
 
या दौऱ्यात सुषमा स्वराज यांनी थायलंड आणि इंडोनेशिया या देशांना भेट दिली आता या दौऱ्यातील शेवटचा दौरा त्यांचा सिंगापूर या देशाचा राहणार आहे. भारताचे परराष्ट्र धोरण अजून मजबूत करण्याच्या उद्देशाने सुषमा स्वराज या दौऱ्यासाठी गेल्या आहेत. इंडोनेशियाच्या दौऱ्यात स्वराज यांनी आज ‘आशियान इंडिया नेटवर्क ऑफ थिंक-टँक’ संमेलनाचे उद्घाटन देखील केले. 
 
 
 
भारताच्या ‘अॅक्ट इस्ट पॉलीसी’ च्या अंतर्गत हा दौरा आहे. सुषमा स्वराज या बऱ्याच कालावधीनंतर विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. काही महत्वाच्या मुद्द्यांवर या दौऱ्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@