अखिल भारतीय माळी महासंघातर्फे पारितोषीक वितरण व नगरसेविकांचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नंदुरबार - नंदुरबार येथील अखिल भारतीय माळी महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन) निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे पारितोषीक वितरण तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम येथील स्वामी विवेकानंद हायस्कुलमध्ये घेण्यात आला. या रांगोळी स्पर्धेत १४२ विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला होता.
 
 
 
पारितोषीक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीलाल महाजन हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश गोरख माळी यांनी केले. कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सिंधुताई दशरथ माळी, सौ.मंगलाबाई महादू माळी, सौ.संगिताबाई तुकाराम सोनवणे, नगरसेवक निलेश श्रीराम माळी, स्वामी विवेकानंद हायस्कुलचे मुख्याध्यापक बापुसाहेब तुळशिराम अहिरे, सामाजिक कार्यकर्ते धनराज श्रावण माळी, माळी समाजाचे उपाध्यक्ष किसन निंबा माळी, शंकर देवरे, सरला शांतीलाल महाजन, वासुदेव निंबा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष व मान्यवरांनी म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत व सत्कारानंतर विद्यार्थ्यांना पारितोषीक वितरण करण्यात आले.
 
 
 
रांगोळी स्पर्धेत काकर्दे येथील सृष्टी भरत माळी (प्रथम), गायत्री पांडुरंग माळी (द्वितीय), शितल कन्हैय्यालाल माळी (तृतीय), सुंदरदे येथील रुपाती युवराज माळी व तेजस्विनी भास्कर माळी (प्रथम), निता पोपट माळी (द्वितीय), अश्‍विनी विजय माळी (तृतीय), तर नंदुरबार येथील योगित लक्ष्मण माळी (प्रथम), गायत्री देविदास सुर्यवंशी (द्वितीय) तर आरती प्रकाश वाघ व पुजा जगन्नाथ गुरव (तृतीय) यांचा पारितोषीक देवून गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोहन गायकवाड हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थीनींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे. यातून सर्वांनी प्रगती करावी, असे आवाहन केले. शांतीलाल महाजन यांनीही यावेळी फुले दाम्पत्याच्या सामाजिक कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्की पाटील यांनी तर आभार प्रदर्शन या.ना.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश माळी, पोपट माळी, जगन माळी, कुणाल माळी, धर्मेंद्र माळी, कन्हैय्या माळी आदींनी परिश्रम घेतले.
 
@@AUTHORINFO_V1@@