‘महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
रोहतक: हरियाणामधील रोहतक येथे आजपासून ‘महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ला सुरुवात होत आहे. ३०० पेक्षा जास्त महिला मुष्टियोद्धा या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. २०१८ ची ‘महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ ही स्पर्धा आजवरची भारतातील सगळ्यात मोठी स्पर्धा ठरणार आहे.
 
कॉमनवेल्थ स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेनंतर या स्पर्धेनंतर भारतात ही सगळ्यात मोठी स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये सरिता देवी, सर्जुबाला, सोनिया लेदर सहित अनेक महिला मुष्टियोद्धा या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेमध्ये सगळ्या महिला मुष्टियोद्धांची मेहनत दिसणार आहे.
 
भारताची प्रसिद्ध मुष्टियोद्धा मेरी कॉम ही या स्पर्धेत भाग घेणार नसली तरी देखील भारताच्या नव्या महिला मुष्टियोद्धांना ही स्पर्धा अतिशय महत्वाची ठरणार आहे. आज ही स्पर्धा सुरु होणार असून १२ जानेवारीला ही स्पर्धा संपणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@