जेव्हा हिंदी पडद्यावरची गुजराती कलाकार मराठी गाणे म्हणते..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |

 
मुंबई :  असे म्हणतात की संगीताला भाषेचे बंधन नसते. हे खरे देखील आहे. मानसी पारेख या हिंदी छोट्या पडद्यावरच्या तारकेने सिद्ध केले आहे. हिंदी मालिकांमध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या मानसी पारेख हिने अनेकदा इंस्टाग्रामवर आपल्या १ वर्षाच्यामुलीसोबत गाण्याचे काही व्हिडियोज शेअर केले आहेत, मात्र सध्या गाजतोय तिचा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" हा व्हिडियो.
 
 
 
 
मानसीने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरुन हा व्हिडियो शेअर करत तिने म्हटले आहे की, "संगीताला भाषेचे बंधन नसते हे खरे आहे, निर्वीचे आवडते "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" हे बालगीत आज मी तुमच्यासाठी गाणार आहे." या गाण्यासाठी गिटार वर साथ देणाऱ्या साहिलचे देखील तिने आभार मानले आहे. तसेच पूर्ण गाणे बघण्यासाठी माझे फेसबुक पेज बघा असे आवाहन देखील तिने केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
सुमित संभाल लेगा, गुलाल, इंडिया कॉलिंग अशा अनेक मालिकांमधून प्रसिद्ध झालेली मानसी पारेख एक प्रसिद्ध गुजराती गायिका देखील आहे. तिने अनेक गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. गेल्या एक वर्षापासून मानसी आपल्या चिमुकली निर्वी सोबत अनेक गाण्यांचे व्हिडियोज शेअर करते. या व्हिडियोजला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तिच्या व्हिडियोजना ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@