तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |


 
हैदराबाद :  तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्राच्या पदरात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद आले आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने राष्ट्रीय कबड्डीचं विजेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने सेनादलाचा ३४-२९ या अंकानी पराभव करत विजय मिळवला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच त्यांच्यामुळे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव मोठे झाले म्हणून महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
 
 
 
याआधी २००६ मध्ये म्हणजेच ११ वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१८ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या या स्पर्धेत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. रिशांक देवडिया याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. उपात्यंफेरीत महाराष्ट्राने कर्नाटकावर तर अंतिम फेरीत सेनादलावर मात केली आहे.
 
या स्पर्धेत संघातील रिशांक देवाडिगासह गिरीश इर्नाक, विराज लांडगे, ऋतुराज कोरवी आणि नितीन मदने यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच संपूर्ण संघाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर हा विजय महाराष्ट्राला मिळाला.
@@AUTHORINFO_V1@@