लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा होण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
रांची : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या १५ अन्य साथीदारांच्या शिक्षेसंबंधीचा अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे. रांची येथील सीबीआयचे विशेष न्यायालय आज लालू आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या शिक्षेसंबंधी अंतिम सुनावणी करणार आहे.
 
ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेसंबंधीची तारीख पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे लालू यांना शिक्षा कधी सुनावली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर ‘तारीख पे तारीख’ अशी न्यायालयाची भूमिका होत असल्याने आज तरी लालू यांना शिक्षा सुनावली जाते काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
 
चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तूर्तास ते जामीनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत. लालू प्रसाद यादव यांनी १९९० च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री असताना चाऱ्याच्या पैशांसंबधी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, या संबंधी त्यांना आता शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
 
 
काय आहे प्रकरणी ?
चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.
@@AUTHORINFO_V1@@