संपूर्ण देशात थंडीचा कडाका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या थंडीच्या कडाक्याने संपूर्ण देश गारठून निघाला आहे. राजधानी दिल्ली येथील बऱ्याच रेल्वे गाड्या वाढत्या धुक्यामुळे रोज रद्द तसेच उशिराने धावत आहेत. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत थंडीने कहर केला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, भोपाळ आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव सध्या चांगलाच जाणवत आहे.
 
संपूर्ण देशातील तापमान सध्या खाली उतरले असून धुक्यामुळे बरेच रस्ते, रेल्वे गाड्या तसेच उड्डाण काही तासांसाठी बंद तसेच उशिराने सुरु करण्यात येत आहे. सध्या भारतातील मुख्य शहरांमध्ये तापमान चांगलेच उतरले आहे.
 
आग्रा-१९ अंश सेल्सिअस, अमृतसर - १५ अंश सेल्सिअस, भोपाळ - १९ अंश सेल्सिअस, चंडीगड – १७ अंश सेल्सिअस, दिल्ली – १९ अंश सेल्सिअस, पटना – २० अंश सेल्सिअस, शिमला – १० अंश सेल्सिअस, श्रीनगर – ७ अंश सेल्सिअस, चेरापुंजी – १४ अंश सेल्सिअस, भुवनेश्वर – २२ अंश सेल्सिअस, नागपूर- २० अंश सेल्सिअस, पुणे- १८ अंश सेल्सिअस अशा प्रकारचे तापमान सध्या संपूर्ण देशात अनुभवायला मिळत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@