स्वच्छता दर्पण रँकींगमध्ये चंद्रपूर देशात पहिले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
२६ जानेवारीपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार
 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा परिषदेने गेल्या २ ऑक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्हयात अवघे १७६ कुटूंबांकडे शौचालय बाकी असून देशात हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणा-या जिल्हयामध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. २६ जानेवारीपूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मागदर्शनात सुरु असलेल्या या प्रयत्नाला स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिकेत भारतात पहिले स्थान मिळाले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिक देण्यात आले आहे. त्यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणा-या चंद्रपूर जिल्हयाने पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्हयाला ६९.११ टक्के गुण मिळाले.
केंद्र शासनाने केलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७ , लातूर ९ , अहमदनगर १० , उस्मानाबाद १६ , औरंगाबाद ३८ , अकोला ४२ , परभणी ४५ , वाशिम ५० , धुळे ५५ , हिंगोली ६० , जळगाव ६३ , तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@