"मी माझी 'दलित' ओळख कधीच वापरली नाही..."

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
मुंबई :  ट्विटरवर ट्विटयु्दध छिडणे हे काही नवीन नाही. समाज माध्यमांवर वादावादी सुरु व्हायला साधेसे कारणही पुरते, मात्र ज्यावेळी आजू बाजूला काही घडामोडी होतात त्यावरुन प्रसिद्ध व्यक्तींमध्ये झालेल्या ट्विटयु्दधामुळे चर्चेला उधाण येते. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. मसान या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांच्यात आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात असेच एक ट्विटरयुद्ध सुरु झाले आहे. विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटला उत्तर देताना नीरज घायवान यांनी "मी माझी दलित ओळख कधीच वापरली नाही." असे कठोर शब्दात उत्तर दिले आहे.
 
 
 
 
त्याचे झाले असे की विवेक अग्निहोत्री यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य करत, "काही काळांपूर्वी मी एका प्रसिद्ध दलित नेत्याच्या नातवाला विमानात बिझनेस क्लासमध्ये ए१ जागेवर बसलेलं बघितलं. मी ते लिहून ठेवलं होतं, आज सहजच आठवलं म्हणून....." असे ट्विट केले.
 
यावर नीरज घायवान यांनी उत्तर देत " मी एक दलित आहे. मी देशासाठी कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार मिळवले आहेत. तसेच मी देशासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर देखील मिळवला आहे, आणि हे सगळे माझ्या "दलित" या ओळखीचा वापर न करता मिळवले आहे. आणि हो मी देखील बिझनेस क्लास मधून प्रवास करतो, पुढल्यावेळी माझ्या विमानात तुम्ही असाल तर मी तुम्हाला माझी जागा देईन." असे म्हणत टोला लगावला आहे.
 
 यावर प्रत्यूत्तर देत विवेक अग्निहोत्री यांनी "एक चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून मला तुमचा अभिमान आहे, तसेच तुमच्या ट्विटची सुरुवात मला आवडली असे प्रतिपादन केले. 
 
 
 
विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटवर भाजपचे नेते तरुण विजय यांनी देखील टीका केली आहे. नीरज घायवान यांची प्रशंसा करत ते म्हणाले की, "तुमच्या धाडसाबद्दल मला तुमचा अभिमान आहे." "प्रिय विवेक अग्निहोत्री एक दिवस तुम्ही दलित म्हणून कार्य करुन बघा, हे ट्विट करण्याआधी एकदा तुम्ही त्यांचे आयुष्य जगून बघा त्यानंतर भाष्य करा. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत असताना ५ वर्ष दलितांच्या वस्तीत कार्य केले आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी एकसारखेच विचार ठेवता येणार नाहीत." असे म्हणत त्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टोला लगावला आहे. 
 
 
 
 
 
सध्या संपूर्ण वातावरण जातीय झाले असल्याचे दिसून येत आहे. तसेच या ट्विटरयुद्धामुळे सिनेसृष्टीदेखील यापासून लांब राहू शकली नाही हे दिसून आले आहे. या ट्विटरयुद्धामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@