संघाचे ज्येष्ठ प्रचारक विष्णुपंत मुठाळ यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

 
 
 
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक विष्णुपंत विश्वेश्वरराव मुठाळ यांचे काल नागपूर येथील स्मृतिभवन परिसरात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
 
 
काल दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका प्रमिलाताई मेढे, रा. स्व. संघाचे रविन्द्र जोशी व अनेक स्वयंसेवकांनी रेशिमबागला त्यांचे अंतिम दर्शन घेतले. संध्याकाळी ५.३० वाजता गंगाबाई घाट येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी श्रद्धांजली वाहिली. संघाचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
 
 
अल्प परिचय -
मूळचे नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावचे असलेल्या विष्णुपंतांचा जन्म दि. ८ फेब्रुवारी १९२३ ला झाला. अवघ्या चौदाव्या दिवशी त्यांचे मातृछत्र हरवले. १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शिक्षण घेत असताना तरोडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क आला व ते दैनिक शाखेत जाऊ लागले. शिक्षण समाप्ती नंतर १९४६ पासून संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झाले व हे व्रत त्यांनी आजीवन पाळले. आपल्या जीवनाचा ७० वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी प्रचारक म्हणून व्यतीत केला.
 
नागपूर जिल्ह्यातून प्रचारक जीवनाची सुरुवात केल्यानंतर संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी व तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सचिव म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले. १९४८ च्या संघबंदी मध्ये ते केंद्रीय कारागृहात होते. १९७५ च्या बंदिकाळात त्यांनी नागपूर व भंडारा येथे भूमिगत राहून काम केले. १९९५ पासून त्यांचा स्मृतिभवन रेशीमबाग येथे निवास होता. आपल्या आयुष्यात त्यांनी संघाच्या विविध सेवाकार्यांना उदार अंतःकरणाने अनेक देणग्या दिल्या. आपल्या संघजीवनात त्यांना संघाचे पहिल्या फळीचे विविध ज्येष्ठ प्रचारक तसेच जगद्गुरू शंकराचार्य यांचा दीर्घ सहवास लाभला.
@@AUTHORINFO_V1@@