'हे सांत्वन मिळवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न ' - परराष्ट्र मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

कुलभूषण जाधव यांच्या नव्या व्हिडीओवर भारताची प्रतिक्रिया




नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचा नवीन व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आल्यानंतर 'पाकिस्तानला अशा खोट्या गोष्टी करण्याची सवयच आहे' अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसेच पाकिस्तानने खोट्या गोष्टी जगासमोर आणून स्वतःसाठी सांत्वन मिळवण्याचे प्रयत्न करू नये,' असा सल्ला देखील भारताने दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पाकिस्तानच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. 'पाकिस्तानच्या या कृतीचे आम्हाला कसलेही आश्चर्य वाटत नाही. कारण पाकिस्तानला खोट्या गोष्टींचा प्रचार करण्याची सवयच आहे. परंतु आता जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा काय आहे ते समजलेले आहे. त्यामुळे खोट्या गोष्टींचा प्रसार केल्यामुळे जगातील इतर आपल्या सांत्वनासाठी पुढे येतील, ही आशा पाकिस्तानने सोडून द्यावी' अशी खरमरीत टीका कुमार यांनी पाकिस्तानवर केली आहे. दरम्यान पाकिस्तानकडून मात्र भारताच्या या टीकेवर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तान सरकारकडून गेल्या दोन दिवसांपूर्वी कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता. यामध्ये जाधव यांनी पाकिस्तान सरकार आपली खूप काळजी घेत असल्याचे म्हटले होते. तसेच भारताने काउन्सिल अॅक्सेससाठी प्रयत्न केले पाहिजे, असे या व्हिडीओमध्ये म्हटले होते.
@@AUTHORINFO_V1@@