भारत आणि द.आफ्रिका पहिला कसोटी सामना आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |


केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज द. आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणार आहे. त्यामुळे श्रीलंकेला नमवल्यानंतर आता आफ्रिकेवर देखील भारतीय संघ विजय मिळवणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय स्थानिक वेळेनुसार आज दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये दोन्हीही संघांनी कसोटीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे दोन्ही संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या (भारत) आणि दुसऱ्या (द.आफ्रिका) स्थानावर आहेत. त्यामुळे कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावण्यासाठी द.आफ्रिकेची लढणार आहे, तर पहिल्या स्थानावर आपलेच वर्चस्व ठेवण्यासाठी म्हणून भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील आपल्या थोड्यादिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे द.आफ्रिका दौऱ्यामध्ये त्याच्याकडून पुन्हा एकदा उत्तम खेळीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे. तसेच आफ्रिका दौरा लक्षात घेऊन संघामध्ये देखील थोडे बदल करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात झालेलेल्या भारत-श्रीलंका यांच्यातील तिन्ही प्रकारातील कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पूर्ण धुव्वा उडवून दिला होता. त्यानंतर नव्या वर्षामध्ये भारतीय संघाची गाठ द.आफ्रिका संघाशी पडत आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे दोन्ही तुल्यबळ आमनेसामने आपल्यामुळे काय होणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
@@AUTHORINFO_V1@@