#BabaRamdeveffect : वेदशक्ती बरोबर कोलगेट देणार पंचाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |


मुंबई : बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' उद्योग समूहाने बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर भारतामध्ये असलेल्या सर्व विदेशी कंपन्यांची पळताभुई थोडी झाली आहे. त्यामुळे विदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक नवनवीन फंडे वापरत आहे. भारताबरोबरच जगभरातील बाजारपेठेत एक मोठा 'ब्रॅण्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कोलगेट' ही कंपनी देखील अशाप्रकारचे काही नवीन फंडे सध्या वापरत आहे. पतंजलीच्या 'दंतकांती' या उत्पादनाला बाजारत टक्कर देण्यासाठी कोलगेटने आणलेल्या 'वेदशक्ती' या आपल्या नव्या उत्पादनाबरोबर आता ग्राहकांना मोफत 'पंचाग' वाटण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. बाजारपेठेतील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सध्या कंपनीने सध्या हा नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे.


कोलगेटने आपल्या 'सिबाका वेदशक्ती' या उत्पादनाचे नवीन आउटलेट्स बाजारत उतरवले आहेत. या आउटलेट्सबरोबर कंपनीने ग्राहकांना मोफत पंचाग देण्यास सुरुवात केली आहे. कोलगेटच्या १७५ ग्रॅमच्या आउटलेटमध्ये ग्राहकांना मोफत पंचाग देखील मिळेल, असे कंपनीने आपल्या उत्पादानावर लिहिले आहे. तसेच वेदशक्तीबरोबर कोलगेटने 'सुवर्णशक्ती' नावाचे आणखीन एक दंतमंजनाचे उत्पादन बाजारात उतरवले आहे. यामध्ये देखील भारतीय आयुर्वेदावर आधारित वस्तूंचा या दंतमंजनमध्ये समावेश करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बाजारपेठेमध्ये प्रवेश केल्यानंतर 'स्वदेशी' वस्तूंची एक मोठी मोहीम सध्या देशात सुरु झाली आहे. यामुळे परदेशी कंपन्यांची भारतातील मागणी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक विदेशी कंपन्या सध्या धडपड करत असल्याचे दिसत आहेत. परंतु कोलगेटच्या या नव्या प्रयोगाचा भारतीय ग्राहकांवर किती परिणाम होईल सांगणे मात्र अवघड आहे. 
@@AUTHORINFO_V1@@