संसदेचे हिवाळी अधिवेशन अखेर संपले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |


 
नवी दिल्ली :   संसदेचे हिवाळी अधिवेशन आज अखेर संपले. या अधिवेशनात बरेच काही घडले. काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, काही निर्णय अद्यापही गुलदस्त्यात राहीले तर अनेकदा गदारोळामुळे कामकाज तहकूबही झाले. राज्यसभेत तब्बल १५ वर्षांनी शून्यप्रहरात सर्व प्रश्नांचा समावेश करण्याच आला आणि यादीत असलेल्या प्रश्नांवर चर्चा देखील झाली. हे हिवाळी अधिवेशन अनेक कारणांनी महत्वाचे ठरले.
 
 
 
सगळ्यात जास्त चर्चेत असलेले तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले मात्र राज्यसभेत अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
 
 
 
 
या कारणांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन गाजले :  
 
संसदेचे हिवाळी अधिवेशन दोन कारणांनी खूप गाजले ते म्हणजे तिहेरी तलाक विधेयक आणि भीमा कोरेगाव येथे झालेला गदारोळ. लोकसभेत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली, यामुळे संसदेत गदारोळ झाला, तर तिहेरी तलाक विधेयकासाठी एक विशेष समिती गठित करण्यात यावी या मागणीवर विरोधक अडून राहिल्यामुळे गदारोळ झाला आणि राज्यसभेत विधेयकाला मंजूरी मिळाली नाही.
 
लोकसभेत राज्यसभेपेक्षा अधिक काम :  
 
हिवाळी अधिवेशनात लोकसभेत राज्यसभेपेक्षा अधिक काम झाले. लोकसभेत एकूण १६ विधेयके मांडण्यात आली. ज्यामध्ये तिहेरी तलाक सह १२ विधेयकांना मंजूरी मिळाली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लोकसभेत उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@