विराट ठरला आयपीएलचा सर्वाधिक महागडा खेळाडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

 
यंदाची आयपीएल एक वेगळा चर्चेचा विषय बनली आहे. ती केवळ भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहली मुळेच. विराट कोहली आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे.
 
विवो तर्फे झालेल्या लिलावात खेळाडूंची संघातर्फे बोली लावली गेली. त्यात रॉयल चॅलेन्जर बंगळूरू तर्फे विराट कोहलीवर आत्तापर्यंतची सर्वात मोठी १७ कोटीची बोली लावली गेली आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर चेन्नई सुपर किंग्जतर्फे आणि रोहित शर्मावर मुंबई इंडियनतर्फे प्रत्येकी १५ कोटीची रक्कमेची बोली लावली गेली आहे.
 
या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि सनराईजर्स हैदराबाद तर्फे प्रत्येकी १२ कोटीची बोली लागली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जतर्फे सुरेश रैना, मुंबई इंडियन तर्फे हार्दिक पांड्या आणि रॉयल चॅलेन्जर बंगळूरू तर्फे एबी डेव्हीलर्स वर प्रत्येकी ११ कोटीची बोली लागली आहे.
 

 
विराट कोहली हा पहिला असा आयपीएल खेळाडू आहे जो आपल्या बोलीच्या वेळी तेथे हजार नव्हता, तरी देखील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला पसंती दिली गेली. कोहलीवर लागलेल्या या बोलीबाबत देखील अनेक प्रश्न विचारले जात आहे. जर प्रत्येक संघाचा सर्वाधिक बोलीचा आकडा १५ कोटीचा होता तर रॉयल चॅलेन्जर बंगळूरूने १७ कोटीची बोली का लावली? मात्र आयपीएलच्या डीडक्शन नियमांचे यात उल्लंघन न झाल्यामुळे त्यावर कुठलाही कायदेशीर आरोप होऊ शकलेला नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@