महानगरपालिकेने दिली सव्वा दोनशे कोटींच्या कामांना मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 

नाशिक : महापालिकेच्या बांधकाम विभागाने २१८.५५ कोटी रुपये खर्चाच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. ७ फेबु्वारीला निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चालू आर्थिक वर्षातच मार्च अखेर ठेकेदारांच्या हाती कार्यादेश पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजपत्रकात सदर रस्ते विकास कामांच्या खर्चाची तरतूद करण्यात सत्ताधारी भाजपाने बाजी मारली असून त्यामुळे स्पील ओव्हरही वाढणार आहे.
 
शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सर्वप्रथम थेट लेखी पत्र देत विकासकामांना विरोध दर्शविला होता. काँग्रेस-राष्टवादीही या विरोधात सहभागी झाली तर शिवसेनेची भूमिका संदिग्ध राहिली. महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षक यांनी या कामांबाबत निधी उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता सुधारित अंदाजपत्रकात या कामांसाठी तरतूद करण्यात येत असून मार्चअखेर पर्यंत कार्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर डांबर पडण्यास सुरूवात होणार आहे. एमआयडीसी परिसरात ८.८६ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. प्रभाग ११ ला दुहेरी लाभ होणार असून प्रभागातील रस्त्यांसाठीही ६.२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाला ७.५० कोटी रुपये याप्रमाणे रस्ते विकासाचा निधी मिळणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@