दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे ठेवले २८७ धावांचे लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
न्यूलँड: केपटाऊनमधील न्यूलँड येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे २८७ धावांचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे भारत हे लक्ष भेदण्यासाठी आता मैदानावर उतरला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
 
 
 
या सामन्यात भारताने पहिल्यांदाज दक्षिण आफ्रिकेला धक्का देत पहिल्यादाच २० चेंडूंमध्ये तीन बाद केले. त्यामुळे या सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली होती. तसेच भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चांगलेच रोखून धरले. भारताने दक्षिण आफ्रिकेचे सर्व गडी बाद करत २८७ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा सामना संपवला.
 
 
 
 
यानंतर आता भारताकडून फलंदाजीची सुरुवात झाली असून दक्षिण आफ्रिकेने देखील भारताला पहिले तीन धक्के दिले आहे. पहिल्याच २० चेंडूत दक्षिण आफ्रिकेने मुरली विजय याला केवळ एका धावसंख्येवर बाद केले असून शिखर धवन याला १६ धावांवर तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला केवळ पाच धावांवर बाद केले आहे. आता सध्या भारत २८ धावांवर ३ बाद या स्थितीत खेळत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@